banner



How To Create A Blog In Marathi Language

चला, ब्लॉगलेखन करू या!

| | Updated: Mar 11, 2019, 10:36 AM

लिखाणातून व्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे. लेखक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ब्लॉग ही छान सुरुवात होऊ शकते. ब्लॉगिंगमधून लिखाणाची आवड जपता येते तसेच स्वतःच्या व्यवसायाचे मार्केटिंगही करता येते. त्यामुळे त्याकडे करिअरच्या दृष्टिकोनातूनहि बघता येते.

blog

प्रा. योगेश हांडगेलिखाणातून व्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे. लेखक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ब्लॉग ही छान सुरुवात होऊ शकते. ब्लॉगिंगमधून लिखाणाची आवड जपता येते तसेच स्वतःच्या व्यवसायाचे मार्केटिंगही करता येते. त्यामुळे त्याकडे करिअरच्या दृष्टिकोनातूनहि बघता येते.

कोणत्याही विषयावर ब्लॉगमधून व्यक्त होऊ शकता. लेखन, फोटो, व्हिडिओ अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉगची सुरुवात करता येते. ब्लॉग लिखित स्वरूपात असेल, तर त्याबरोबर एखादा विषयानुरूप फोटो किंवा व्हिडिओ जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो. बहुतेकांच्या ब्लॉगला केवळ देशातीलच नव्हे, तर इतर देशांतील अनेक लोक वाचतात. त्यामुळे ब्लॉगच्या माध्यमातून 'ग्लोबल सिटिझन'ही होता येतं.

ब्लॉगला मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियांकडे सकारात्मकतेने बघितले पाहिजे. वाचक ब्लॉगवर त्यांची मतं व्यक्त करत असतात. तसा तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या प्रतिक्रिया नकारात्मक असल्या, तरी त्यांच्या मतांचा आदर ठेवलाच पाहिजे. नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करून तुमचं लिखाण सुरू ठेवा. उगाचच सोशल मीडियावरुन वाद घालू नका.

ब्लॉग कसा लिहावा/तयार करावा?

गुगलची 'blogger.com'ही साइट तुम्हाला फुकट ब्लॉग लिहिण्याची संधी उपलब्ध करून देते.

ब्लॉग लिहिण्याच्या पायऱ्या

१. www.blogger.com या वेबसाइटला भेट देऊन 'जी-मेल'ने लॉगइन करावे.

२. लॉग इन झाल्यावर तिथे डॅशबोर्ड (Dashboard) दिसेल. त्यावर तुमचे किती ब्लॉग्स आहेत, किती लोकांनी त्याला भेटी दिल्या आदी माहिती दिसेल.

३. नवीन ब्लॉग तयार करण्याकरिता 'New Blog'वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रिनवर 'Title' आणि 'Address' यांची विचारणा होईल.

३. त्यानंतर 'Title' म्हणजे तुमच्या ब्लॉगचे नाव दिसेल. उदा : माझ्या ब्लॉगचे Title 'सायबर सिटी' हे आहे.

४. 'Address' म्हणजे तुमच्या ब्लॉगचा internet address जसा उदा : http://profyogeshhandge.blogspot.in जो स्थिर राहील. तुम्हाला तो बदलता येणार नाही. तसेच Theme ही तुमच्या ब्लॉगच्या विषयावरून निवडता येईल.

५. आता तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे.

६. आता या ब्लॉगवर नवीन लेख लिहिण्यासाठी 'New Post'वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. तेथे तुम्ही तुमचा 'blog' लिहू शकाल.

७. या पेजवर पहिल्या भागात 'Post Title' दिसेल जे तुमच्या 'blog'चे अर्थातच लेखाचे नाव असणार आहे. दुसऱ्या भागात 'blog formatting' चे 'Tools' दिसेल. जिथे तुम्हाला 'typing' करून तुमचा 'blog' लिहता येईल.

८. ब्लॉग लिहीत असतांना लिखाण पूर्ण झालेले नसेल, तर 'Save'वर क्लिक करून ते सुरक्षित ठेवता येईल. एखादा विषयानुरूप फोटो जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो. तो फोटो तुम्हाला येथे जोडता येतो.

९. तसेच ब्लॉग पब्लिश करण्यापूर्वी तो वाचकांना कसा दिसेल, हे पडताळून बघण्यासाठी 'Preview'वर क्लिक करा आणि 'blog' पूर्ण लिहून झाल्यावर 'Publish' या बटणवर क्लिक करून प्रसिद्ध करा.

(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

या बातम्यांबद्दल अधिक वाचा

Web Title : how to write a blog
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

How To Create A Blog In Marathi Language

Source: https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/how-to-write-a-blog/articleshow/68352552.cms

Posted by: birdentle1948.blogspot.com

0 Response to "How To Create A Blog In Marathi Language"

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel